दुचाकी अपघातात कुचेलीत युवक ठार, पादचारी गंभीर

0
64

कुचेली-म्हापसा येथील साईबाबा बार अँड रेस्टॉरंट जवळ काल सकाळी ७.५५ वाजता कुचेलीहून-म्हापशाला जाणार्‍या पल्सर मोटारसायकलने एका पादचारी महिलेला जोरदार धडक देऊन नंतर रस्त्याच्या बाजूची संरक्षण भिंत व वीजेच्या खांबाला धडक दिल्याने दुचाकीच्या मागे बसलेला मौलाली कोरागिरी हा २४ वर्षीय युवक (सध्या राहणारा कुचेली, मूळ कर्नाटक) जागीच ठार झाला.
जीए ०३ एडी ५९०० ही पल्सर घेऊन चालक दादापीर शेरावत (सध्या रा. थिवी, मूळ कर्नाटक) मौलाली याला घेऊन कुचेलीहून म्हापशाला निघाले होते. त्यावेळी कुचेली जंक्शनजवळील साईबाबा बार अँड रेस्टॉरंट जवळून चालत जाणार्‍या माला कांबळी या महिलेला धडक दिल्याने ती जखमी झाली. नंतर जवळच असलेल्या चिरेबंदी संरक्षण भिंतीला व वीजेच्या खांबाला दुचाकीची धडक बसली. यामुळे दुचाकीच्या मागे बसलेला मौलाली कोरागिरी हा रस्त्यावर पडून जागीच ठार झाला. जखमी महिलेला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.