दिल्ली येथे दि. २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी प्रमुख २ आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मोहिंदर सिंग (४५) आणि मनदीप सिंग (३०) यांचा समावेश आहे. या दोघांना जम्मूमधून अटक केली असून लाल किल्ल्यावर आक्रमक झालेल्या आंदोलकांमध्ये या दोघांचा समावेश असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाता मुख्य आरोपी म्हणून गायक कलाकार दीप सिद्धू याला अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत २०० संशयितांची छायाचित्रे जारी केली आहेत. मोहिंदर सिंग हा तर मनदीप सिंग हा गोले गुजरालचा रहिवाशी आहे. याआधी दिल्ली पोलिसांनी जसप्रित सिंगला अटक केली आहे. त्यासोबतच, हातात तलवारी फिरवतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेल्या मनिंदर सिंगला देखील अटक करण्यात आली आहे.