दिल्ली-मॉस्कोच्या विमानांना स्थगिती

0
30

एअर इंडियातर्फे दिल्ली ते मॉस्कोची आधीपासून नियोजित असलेली उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे एअर इंडिया रद्द केलेल्या विमानांच्या प्रवाशांना त्यांचे तिकिटाचे पूर्ण पैसे परत करणार आहे.

रशियन आकाशात घडणार्‍या घडामोडींमुळे ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय विमा एजन्सींनी मॉस्कोला जाणार्‍या व येणार्‍या विमानांवर विमा देण्यास नकार दिल्यामुळे एअर इंडियाने मॉस्को उड्डाणे थांबवली आहेत. एअर इंडियाची दिल्लीहून मॉस्कोला आठवड्यातून दोन उड्डाणे होती.