Home बातम्या दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी सातव्या संशयितास अटक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी सातव्या संशयितास अटक

0

दिल्ली स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने आत्मघाती हल्लेखोर दहशतवादी डॉ. उमर नबीचा साथीदार शोएब याला अटक केली आहे. शोएब फरिदाबादमधील धौज गावाचा रहिवासी आहे. तो अल-फलाह विद्यापीठात वॉर्ड बॉय होता. दहशतवादी उमरला सामान आणण्यात -घेऊन जाण्यात त्याने मदत केली, असा त्याच्यावर आरोप आहे. दिल्ली स्फोट प्रकरणात ही सातवी अटक आहे. शोएबनेच नूंहमध्ये उमरला त्याची मेहुणी अफसाना हिच्या घरी खोली भाड्याने मिळवून दिली होती. 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली स्फोटापूर्वी 10 दिवस उमर याच घरात राहिला होता.