दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चासाठी पोलिसांनी दिली परवानगी

0
199

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनातील शेतकर्‍यांनी उद्या मंगळवार दि. २६ रोजी प्रजासत्ताक दिनी टॅक्टर मोर्चा काढण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्याप्रमाणे ह्या मोर्चासाठी दिल्लीतील तीन ठिकाणी काही किलोमीटरच आत येण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. मोर्चासाठी सिंघू सीमा, टिकरी सीमा व गाझीपूर यूपी गेट अशा तीन मार्गांवरून परवानगी देण्यात आली आहे. मोर्चासाठी टिकरी सीमेवर ७ हजार, गाझीपूर सीमेवर १ हजार तर सिंघू सीमेवर ५ हजार ट्रॅक्टर पोहोचले आहेत.