दिल्लीतील 100 शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी

0
5

दिल्ली आणि एनसीआरमधील जवळपास 100 शाळांना बॉम्ब हल्ल्याची धमकी मिळाली. काल पहाटे 4 वाजता या शाळांना ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली. या प्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून काल शाळेचा परिसर खाली करण्यात आला. याठिकाणी बॉम्ब शोधक पथकाद्वारे देखील तपासणी करण्यात आली.

धमकीचा ईमेल मिळालेल्या शाळांमध्ये मयूर विहार येथील मदर मेरी स्कूल, द्वारका येथील दिल्ली पब्लिक स्कूल, चाणक्यपुरी येथील संस्कृती स्कूल, वसंत कुंज येथील दिल्ली पब्लिक स्कूल आणि साकेतमधील एमिटी स्कूल यांच्यासह 100 शाळांचा समावेश होता.
दिल्लीतील शाळांना पहाटे धमकीचा ई-मेल मिळाल्याची तक्रार आमच्याकडे आली होती. त्यानुसार आम्ही संपूर्ण शाळांची झडती घेतली. मात्र, या ठिकाणी आम्हाला कोणतीही बॉम्बसदृष्य वस्तू आढळली नाही, असे दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महला म्हणाले.