माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी खाण संचालक अरविंद लोलयेकर यांना बेकायदेशीर खाण प्रकरणी तपासासाठी गठीत केलेल्या पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने काल समन्स पाठवले.
एकूण सहा जणांना समन्स पाठविले असून त्यात अधिकारी जे. बी. भिंगी, माजी कायदा सचिव व्ही. पी. शेट्ये यांचा समावेश आहे.
सुदीप ताम्हणकर यांनी बेकायदेशीर खनिज उद्योगासंबंधी केलेल्या तक्रारीवरून ही समन्स पाठविली आहेत. लवकरच आणखी काही राजकीय नेते व अन्य जणांना समन्स पाठविली जाण्याची शक्यता आहे.