दिगंबर कामत यांच्या मेहुण्याला समन्स

0
86

खाण घोटाळ्याचा तपास करणार्‍या एसआयटीने माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत यांचे मेहुणे सतीश लवंदे यांना आज गुरूवारी चौकशीसाठी एसआयटीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी काल समन्स बजावण्यात आला आहे.

दरम्यान, दिगंबर कामत यांचे पुत्र योगिराज कामत यांनी काल एसआयटीच्या रायबंदर येथील कार्यालयात हजेरी लावली. एसआयटीच्या अधिकार्‍यांनी योगिराज याला विविध प्रश्‍न विचारून सुमारे दोन तास चौकशी केली. योगिराज याने वडिलांच्या मालमत्तेचा शेल कंपन्यांत गुंतवणूक केल्याचा एसआयटीला संशय आहे.
खाण घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची चौकशी केली जात आहे. कामत यांना शुक्रवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे. मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी त्यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची सूचना केली होती. परंतु, प्रकृती ठीक नसल्याने एसआयटीसमोर उपस्थित राहू शकत नाही, असे त्यांनी एसआयटीला कळविले होते. ते एसआयटीसमोर शुक्रवारी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. खास न्यायालयाने हेदे खाण लीज नूतनीकरण प्रकरणात दिगंबर कामत यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.