दाट धुक्यामुळे दाबोळीतील आठ विमाने इतरत्र वळवली

0
6

दाबोळी विमानतळावर धुक्यामुळे 8 विमानांचे लँडिंग रद्द करण्यात आले. काल बुधवारी सकाळी आठ विमाने दाबोळी विमानतळावर उतरणार होती. मात्र विमानतळावरील खराब हवामानामुळे (धुक्यामुळे ) भारतातील इतर विमानतळांवर ती वळवावी लागली. भारतातील इतर विमानतळांवर वळवण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये मस्कतहून आलेल्या एका आंतरराष्ट्रीय विमानाचा समावेश होता. मुंबईहून दोन, बंगळुरूहून दोन, दिल्लीहून एक, हैदराबादची एक आणि कोचीनची एक अशी विमाने मुंबई, बंगळुरू आणि हैदराबादच्या विमानतळांवर वळवावी लागली. नंतर जेव्हा हवामानाची स्थिती सामान्य झाली, त्यानंतर ही विमाने दाबोळी विमानतळावर दोन ते अडीच तासांच्या विलंबाने उतरली. जी8-0575, एआय-685, 15-818, 6ई-743, डब्ल्यू वाय-277, 6ई-211, 6ई-194, व 15-779 अशी ही विमाने मुंबई, बेंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, कोचीन आणि मस्कत येथून येणार होती. ही विमाने दाबोळी विमानतळावर विलंबाने उतरविण्यात आली. एअर आशिया, गो फर्स्ट, ओमान एअर, इंडिगो यांच्या या फ्लाईट्स होत्या.

गडकरींना भेटणार ः माविन
गोव्यातील पायाभूत सुविधांच्या सुधारणांशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री माविन गुदिन्हो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.
बुधवारी, स्थानिक पत्रकारांशी बोलताना मंत्री माविन गुदिन्हो यांनी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली. यावेळी सुमारे 650 कोटी रुपये खर्चाचा आणखी एक उड्डाणपूल बांधण्याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.