दहा वर्षांनी आधारकार्ड करावे लागणार अपडेट

0
11

>> केंद्र सरकारने केला आधारच्या नियमात बदल

केंद्र सरकारने आधारच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. करून आदेश जारी केले आहेत. केंद्राने जारी केलेल्या आदेशानुसार आता आधार क्रमांक मिळाल्यापासून १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर किमान एकदा ते अपडेट करणे आवश्यक असेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये आधार अपडेट केल्याने सेंट्रल आयडेंटिफिकेशन डेटा रिपॉझिटरीमध्ये (सीआयडीआर) संबंधित माहितीची अचूकता निश्चित होईल.

१० वर्षांनी अपडेट
मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत, आधार नोंदणी झाल्यानंतर दर दहा वर्षांनी किमान एकदा तरी आधारकार्ड अपडेट करण्यास सांगितले आहे. आधारधारक आधार नोंदणीच्या तारखेपासून दर १० वर्षांनी किमान एकदा ओळख आणि रहिवासी प्रमाणपत्र असलेली कागदपत्रे अपडेट करू शकतात. आधार अपडेटबाबत आधारच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

ऑनलाइन सुविधा
ज्यांना आधार क्रमांक मिळाला आहे त्यांनी त्या तारखेपासून १० वर्षांहून अधिकचा काळ झाला असेल आणि त्यांनी संबंधित माहिती पुन्हा अपडेट केली नसेल, तर त्यांनी ती करावी. आणि आधारमधील रहिवासी पुरावा कागदपत्रे यासह अपडेट करावे. आधार अपडेट करणे सोपे करण्यासाठी ऑनलाइन सुविधा विकसित केली आहे. त्यानुसार माय आधार पोर्टल आणि त्यांच्या ऍपद्वारे ही सुविधा ऑनलाइन मिळवता येते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती कोणत्याही आधार नोंदणी केंद्रालाही भेट देऊ शकते.

गतवर्षी १६ कोटी अपडेट
आतापर्यंत १३४ कोटी आधार क्रमांक जारी केले आहेत. या निर्णयामुळे किती आधारधारकांना त्यांची माहिती अपडेट करावी लागेल, हे सध्यातरी माहिती नाही. मात्र, गेल्या वर्षी आधारमध्ये विविध प्रकारचे सुमारे १६ कोटी अपडेट झाले होते.