Home Featured दहावी परीक्षेचा निकाल 95.35 टक्के

दहावी परीक्षेचा निकाल 95.35 टक्के

0

173 विद्यालयांचा 100 टक्के निकाल

उत्तीर्णतेत यंदाही मुलींनी मारली बाजी

मंडळातर्फे दहावीची परीक्षा 1 मार्च ते 21 मार्च 2025 या काळात 32 केंद्रातून घेण्यात आली. दहावीच्या परीक्षेला खासगी 575 विद्यार्थी बसले होते. त्यातील 131 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयटीआय 12 विद्यार्थी बसले होते. त्यातील सर्व अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण (सवलत असलेले) 359 विद्यार्थी बसले होते. त्यातील 172 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नापास 19 विद्यार्थी बसले होते. त्यातील 10 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच, दिव्यांग 477 विद्यार्थी बसले होते. त्यातील 450 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, असे अध्यक्ष शेट्ये यांनी सांगितले.

631 विद्यार्थ्यांना एटीकेटी
दहावीच्या परीक्षेत 631 विद्यार्थ्यांनी एटीकेटी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. एक किंवा दोन विषयात सुधारणा आवश्यक असलेल्या विद्यार्थ्यांनी एटीकेटी सुविधा उपलब्ध केली जाते. दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांचा अकरावीचा निकाल जाहीर केला जाणार नाही, असे मंडळाचे अध्यक्ष शेट्ये यांनी सांगितले.

दहावीसाठी 8802 विद्यार्थ्यांनी सातव्या विषयाचा पर्याय निवडला होता. त्या विषयात 8717 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, सातव्या विषयाचा लाभ घेऊन 576 विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, असे अध्यक्ष शेट्ये यांनी सांगितले.
क्रीडागुणांचा 214 विद्यार्थ्यांना लाभ
क्रीडा गुण 6826 विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. क्रीडा गुणाच्या लाभ घेऊन 214 विद्यार्थी दहावीची परीक्षा उर्तीर्ण झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

100 टक्के निकालामध्ये
43 सरकारी विद्यालये

राज्यातील 173 विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. त्यात सरकारी 43 विद्यालये, अनुदानित 123 विद्यालये आणि विनाअनुदानित 7 विद्यालयांचा समावेश आहे. सत्तरी तालुक्यातील 11 सरकारी विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. डिचोलीतील 7, बार्देश – 1, काणकोण 2, धारबांदोडा 2, केपे 5, पेडणे 5, फोंडा 3, सासष्टी 1, सांगे 1 आणि तिसवाडी तालुक्यातील 3 विद्यालयांचा समावेश आहे. बार्देश तालुक्यातील 23, डिचोली – 10, काणकोण 6, धारबांदोडा 4, केपे 3, मुरगाव 4, पेडणे 15, फोंडा 20, सासष्टी 22, सांगे 2, सत्तरी 3 आणि तिसवाडीतील 11 अनुदानित विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर, डिचोली 2, केपे, मुरगाव, पेडणे, फोंडा आणि तिसवाडी या तालुक्यातील प्रत्येकी 1 विनाअनुदानित विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे, असेही शेट्ये यांनी सांगितले.
दहावीच्या परीक्षेत 2385 विद्यार्थ्यांना 75 ते 100 श्रेणीत गुण मिळाले. 8921 विद्यार्थ्यांना 60 ते 74 श्रेणीत आणि 5425 विद्यार्थ्यांना 46 ते 59 श्रेणीत गुण मिळाले आहेत.
समाज विज्ञान विषयात 45 विद्यार्थांना 100 गुण मिळाले आहेत. खगोलशास्त्र विषयात 26 जणांना, गणित 1 विषयात 7, गणित 2 विषयात – 3, विज्ञान विषयात – 29, फाईन आर्ट विषयात 5 जणांना 100 गुण मिळाले आहेत, असेही शेट्ये यांनी सांगितले.

त्रीसदस्यीय समिती
विद्यालयांकडून विद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या निकाल किंवा पडताळणीबाबत तक्रारीसाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना केली जाणार आहे. अनुपस्थितीमधील गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाचित्र कॉपी, पुनर्मूल्यांकनासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. हा पोर्टल 11 एप्रिलपासून सुरू केला जाणार आहे. दहावीची पुरवणी परीक्षा साधारणपणे 5 मे 2025 पासून सुरू केली जाणार आहे. सुधारणा आवश्यक, एटीकेटी किंवा काही कारणास्तव परीक्षेला न बसलेले विद्यार्थी या पुरवणी परीक्षेला बसू शकतात, असे अध्यक्ष शेट्ये यांनी सांगितले.
मंडळातर्फे दहावीची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील परीक्षा मार्च 2026 मध्ये घेतली जाणार आहे. या परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे, असेही शेट्ये यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला मंडळाचे सचिव विद्यादत्त नाईक, अधिकारी भारत चोपडे आणि रिमा मडगावकर यांची उपस्थिती होती.

डिचोली तालुक्याचा सर्वाधिक; मुरगावचा सर्वात कमी निकाल
डिचोली तालुक्याचा निकाल सर्वाधिक 98.50 टक्के एवढा असून मुरगाव तालुक्याचा निकाल सर्वात कमी 92.97 टक्के एवढा आहे. बार्देश -94.99 टक्के, काणकोण – 95.90, धारबांदोडा – 95.35, केपे – 93.59 टक्के, पेडणे – 97.85 टक्के, फोंडा – 95.06 टक्के, सासष्टी – 94.61 टक्के, सांगे – 94.58 टक्के, सत्तरी – 97.73 टक्के, तिसवाडी -95.38 टक्के निकाल लागला आहे.