दहावीत २ विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश

0
11

>> गोवा शिक्षण मंडळाकडून परिपत्रक जारी

एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत २ विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.

यासंबंधीचे परिपत्रक गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल जारी केले. दहावीचे दोन्ही पेपर सोडवल्यानंतर त्यांचा अकरावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. शिक्षण मंडळाने वर्ष २०१४ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकात दुरुस्ती करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षेत २ विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वर्ष २०२२-२३ या वर्षासाठी अकरावीमध्ये प्रवेश देण्याची सूचना करण्यात आली आहे.

राज्यातील उच्च माध्यमिक विद्यालयांनी वर्ष एप्रिल २०२२ मध्ये दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश द्यावा. या विद्यार्थ्यांना आवश्यक रेमेडियल शिक्षण उपलब्ध करून द्यावे. या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्याशिवाय त्यांचा अकरावीचा निकाल जाहीर करू नये, असे मंडळाच्या सचिव गेराल्डिना मेंडिस यांनी म्हटले आहे.