Home Featured दहावीची पुरवणी परीक्षा 7 ते 14 मे दरम्यान

दहावीची पुरवणी परीक्षा 7 ते 14 मे दरम्यान

0

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून ही पुरवणी परीक्षा येत्या 7 मे ते 14 मे 2025 दरम्यान घेतली जाणार आहे. ही पुरवणी परीक्षा म्हापसा येथील ज्ञानप्रसारक विद्यालय आणि मडगाव येथील महिला आणि नूतन इंग्लिश विद्यालय अशा दोन केंद्रांवर घेतली जाणार आहे. ही पुरवणी परीक्षा दोन सत्रातून घेण्यात येणार आहे. सकाळच्या सत्रातील परीक्षा सकाळी 9.30 वाजता आणि दुपारच्या सत्रातील परीक्षा दुपारी 2.30 वाजता सुरू होणार आहे.

या पुरवणी परीक्षेसाठी येत्या 28 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज सादर केले जाऊ शकतात. उशिरा शुल्कासह 30 एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. पुरवणी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. प्रात्यक्षिक परीक्षा 15 मे रोजी घेतली जाईल.