दहावीचा २८ जुलै रोजी निकाल

0
116

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०२० मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या मंगळवारी २८ जुलै रोजी संध्याकाळी ४.३० वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी काल दिली.
कोविड महामारीच्या काळात नियोजित एप्रिल महिन्यात परीक्षा घेणे शक्य झाले नाही. त्यानंतर दहावीची परीक्षा २१ मे ते ६ जून २०२० या काळात घेण्यात आली आहे. या परीक्षेला राज्यातील सुमारे १९ हजार विद्यार्थी बसले आहेत.