दहावीचा निकाल १ जूनला

0
14

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवार दि. १ जून २०२२ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी काल दिली.

मंडळातर्फे यावर्षी दहावीची परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली होती. पहिली सत्र परीक्षा डिसेंबर २०२१-जानेवारी २०२२ या काळात घेण्यात आली, तर दुसरी सत्र परीक्षा एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आली. राज्यातील सुमारे २० हजार ५७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यात १०,५३० मुलगे आणि १०,०४२ मुलींचा समावेश आहे. ही परीक्षा ३१ प्रमुख केंद्रे आणि १७३ उपकेंद्रांतून घेण्यात आली. मंडळाकडून निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीचा निकाल गोवा मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका ३ जूनपासून डाऊनलोड करायला उपलब्ध केली जाणार आहे. दरम्यान, गतवर्षी २०२१ मध्ये दहावीचा निकाल ९९.७२ टक्के लागला होता. सदर निकाल अंतर्गत गुणाच्या आधारे जाहीर करण्यात आला होता.