दहशतवाद्यांवर कारवाई करा

0
102

>> नवाझ शरीफ यांचा लष्कराला आदेश

 

उरी दहशतवादी हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर एकाकी पडलेल्या पाकिस्तानने सावध पवित्रा घेतला आहे. पाकिस्तानची प्रतिमा खराब होत असल्याने पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानी लष्कर व आयएसआय या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकार्‍यांना दहशतवाद्यांविरोधात त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे.
भारताने पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडी केली आहे. याचे परिणाम भोगावे लागणार असल्याने नवाझ शरीफ यांनी सोमवारी आयएसआयचे महासंचालक जन. रिझवान अख्तर, परराष्ट्र सचिव एजाज चौधरी व लष्कराचे उच्च अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी जैश- ए – मोहम्मद, लष्कर – ए – तोयबा, हक्कांनी नेटवर्क या दहशतवादी संघटनांबरोबरच अतिरेकी मसूद अझहर, हाफिज सईद यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे परिणाम भोगायला सज्ज राहा, असा इशारा दिल्याचे डॉनने म्हटले आहे. या बैठकीत पठाणकोट हल्ला व २६/११ च्या हल्ल्यासंदर्भात तातडीने चौकशी सुरू करण्याच्या निर्णय शरीफ यांनी घेतला आहे.