दहशतवाद्यांच्या ग्रेनेड हल्ल्यात ७ जखमी

0
118

जम्मू काश्मीरमधील त्राल येथे एका बस स्थानकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड बॉम्बने केलेल्या हल्ल्यात ७ जण जखमी झाले. ग्रेनेडचा हवेतच स्फोट झाल्यामुळे मोठे नुकसान झाले नाही. बसस्थानकाजवळ उपस्थित सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा मनसुबा होता. हल्ला करण्यात आलेले बसस्थानक पूर्ण रिकामी करण्यात आले असून परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या हल्ल्यात एक गंभीर जखमी असून इतर सहाजण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला श्रीनगरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.