>> ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात ५० हजार भारतीयांचा सहभाग
भारताने आजपर्यंत दहशतवादाचा सामना केलेला असून दहशतवादाशी लढत असलेल्या भारताच्या पाठिशी अमेरिका सदैव राहील. सीमा सुरक्षा दोन्ही देशांसाठी गरजेची असून भारतीय संरक्षण क्षेत्रात अमेरिका मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश उत्तम प्रगती करत असून विकासाची एकेक पायरी गाठत आहे. त्यासाठीही अमेरिका भारताला मदत करण्यासाठी सदैव तयार आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची एका मजबूत देशाकडे वाटचाल होत असून भारत आणि अमेरिकेचे संबंध अधिक दृढ होत असल्याचे प्रतिपादन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले.
अमेरिकेतील ह्यूस्टन या ठिकाणी सुरू असलेल्या ‘हाऊ डी मोदी’ कार्यक्रमात ट्रम्प बोलत होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ अमेरिकेच्या ह्यूस्टन येथे अमेरिकेतील ‘टेक्सास इंडिया ङ्गोरम’च्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात अमेरिका आणि भारताच्या राष्ट्रगीताने झाली.
विकास हा चर्चित शब्द ः मोदी
विकास हा भारतातील सर्वाधिक चर्चित शब्द असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी, आपल्या देशात ङ्गक्त भाषाच नव्हे तर, सण-पंरपरा, ऋतू, रितीरिवाज आहेत. विविधेत एकता हाच लोकशाहीचा आधार, शक्ती आणि प्रेरणा असल्याचे मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे नाव ‘हाउडी मोदी’ आहे. पण १३० कोटी भारतीयांशिवाय मोदी काहीच नाही असे सांगून मोदी यांनी, ह्यूस्टनमधील या कार्यक्रमांच्या आयोजकांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान मोदी यावेळी त्यांनी फिर एक बार ट्रम्प सरकार असा नारा दिला. यावेळी मोदींनी ट्रम्प यांना, तुम्ही मला तुमच्या कुटुंबीयांची भेट घालून दिली होती. आज मी तुम्हाला ह्यूटनमधील माझ्या भारतीय कुटुंबीयांची भेट करून देतो असे सांगताच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भारतीयांनी टाळ्या वाजवून एकच जल्लोष केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताचे चांगले मित्र असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. मोदी म्हणाले की, आज दोन मोठ्या लोकशाही राष्ट्रांच्या मैत्रीचा दिवस आहे व आज इतिहास घडत असताना संपूर्ण जग साक्षीदार आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘की ऑङ्ग ह्यूस्टन’ देऊन सन्मानित करण्यात आले.
भारत आणि अमेरिकेच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. मोदींचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर थोडावेळाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दाखल झाले होते. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्रम्प यांचे या ठिकाणी स्वागत केले.
या कार्यक्रमाची जोरदार तयारी करण्यात आली होती, ठिकठिकाणी पंतप्रधान मोदींच्या स्वागताचे पोस्टर लावण्यात आले होते. तसेच, विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.