थिवीतील अपघाता महिला जागीच ठार

0
41

माडेल-थिवी येथे काल सकाळी ८.५० वाजण्याच्या दरम्यान कार व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात श्रीविधा संदेश सावंत (३८, रा. आराडी-साळगाव) ही महीला जागीच ठार झाली.

याबाबत कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीविधा सावंत या आपल्या दुचाकी (क्र. जीए-०३-एएन-२६९८) वरून साळगावहून माडेल येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीच्या रस्त्याकडे पोहचल्या असता, अस्नोडामार्गे येणार्‍या कार (क्र. जीए-०१-आर-३५६३) व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक बसली. त्यात श्रीविधा सावंत या जागीच ठार झाल्या. कोलवाळ पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मंदार परब यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठवून दिला.