‘त्या’ जमिनींची म्युटेशन, विभागणी, रुपांतरे थांबवा

0
14

बनावट मालकी कागदपत्रे तयार करून उत्तर गोव्यातील ज्या ९२ जमिनींची विक्री करण्यात आलेली आहे, त्या जमिनींचे म्युटेशन, विभागणी व रुपांतरे आदीे कामे सरकारकडून पुढील आदेश येईपर्यंत केली जाऊ नयेत, असा आदेश काल उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी काढला. या प्रकरणांचे तपासकाम सध्या सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) चालू असून, या प्रकरणातील ५ संशयित गुन्हेगारांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.