येथील मांडवी पुलावर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास रेंट-अ-कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातानंतर उसळून थेट मांडवी नदीत पडलेल्या दुचाकीचालकाचा अजूनपर्यंत थांगपत्ता लागू शकलेला नाही. दुचाकीचालकाचा शोध घेण्यासाठी अग्निशामक दल, तटरक्षक दल, नौदलाचे साहाय्य घेण्यात आले आहे.