महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

0
2

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने काल पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. गुरुवारी रात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महाराष्ट्रातील पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून मनोहर जोशी यांची ओळख होती. गेली काही वर्षे ते सक्रिय राजकारणापासून दूर होते. सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, 1976 ला मुंबईचे महापौर, मार्च 1990 ते डिसेंबर 91 विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च 1995 ते जानेवारी 1999 या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर 99 ते मे 2002 केंद्रात वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे 2002 ते ऑगस्ट 2004 लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा राजकीय आलेख चढता राहिला होता.