तीन पंचायतींसाठी ८९.४७ टक्के मतदान

0
17

पेडणे तालुक्यातील हळर्ण, कासारवर्णे आणि चांदेल-हसापूर यांनी तीन ग्रामपंचायतींसाठी काल ८९.४७ टक्के मतदान झाले. या तीनही ग्रामपंचायत क्षेत्रात शांततेत मतदान पार पडले.

कासारवर्णे ग्रामपंचायत क्षेत्रात ९१.०७ टक्के, हळर्ण ग्रामपंचायत क्षेत्रात ९०.५५ टक्के आणि चांदेल-हंसापूर ग्रामपंचायत क्षेत्रात ८७.४२ टक्के मतदानाची नोंद झाली. मतमोजणी रविवार दि. ११ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून विनोर्डा-पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालयाच्या आवारात करण्यात येणार आहे.