Home बातम्या तिसवाडीत ज्येष्ठ नागरिकाची

तिसवाडीत ज्येष्ठ नागरिकाची

0

ॲगोडाचा अधिकारी असल्याचे भासवून ॲप डाऊनलोड करायला भाग पाडून तिसवाडीतील एका ज्येष्ठ नागरिकाची 3.48 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात जुने गोवा पोलीस स्थानकावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना गेल्या 16 मार्च 2026 रोजी घडली आहे. तिसवाडी तालुक्यातील एका ज्येष्ठ नागरिकाशी एका व्यक्तीने संपर्क साधून त्यांना एक मोबाईलवर एक ॲप इन्स्टॉल करण्यास प्रवृत्त केले. ज्याद्वारे त्यांच्या बँकेचा तपशील मिळवण्यात आला. त्यानंतर त्या फसवणूक करणाऱ्याने भामट्याने त्यांच्या बँक खात्यातून 3,48,459.96 चे अनधिकृत व्यवहार केले, असे तक्रारीत म्हटले आहे.