…तर ४ मेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा : राज ठाकरे

0
20

मशिदींवरील भोंगे हा धार्मिक विषय नाही, तर ती एक सामाजिक समस्या आहे. मात्र ज्याला कोणाला हा धार्मिक विषय वाटत असेल, त्यांना आम्ही धर्मानेच उत्तर देऊ. ४ मेपासून आपण कोणाचेही ऐकणार नाही. मशिदींवरील भोंगे सुरू झाले की त्यांच्यासमोर दुप्पट आवाज हनुमान चालिसा लावणारच, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील सभेत दिला.

आता ३ तारखेला ईद आहे, त्यांच्या सणात मला विघ्न आणायचे नाही; पण ४ तारखेपासून आपण कुणाचेही ऐकणार नाही. मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत, तर ४ तारखेपासून हनुमान चालिसा लावा, दुप्पट आवाजात लावा. हवे तर पोलिसांची परवानगी घ्या. विनंती करून समजत नसेल, तर मग आमच्यासमोर पर्याय नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार देशातील सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरले पाहिजेत, असेही ते म्हणाले.