…तर भाजपचा विजय नक्की : आमदार सरदेसाई

0
93

कॉंग्रेसने जर भाजपविरुध्द महायुती केली नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय नक्की आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रश्‍नावरून कुणी माझ्यावर टीका करून काहीही साध्य होणार नाही, असे ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी काल या प्रतिनिधीला सांगितले.

परवा पणजीत झालेल्या कॉंग्रेस गट अध्यक्षांच्या बैठकीत काही गट अध्यक्षांनी विजय सरदेसाई यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. काल विजय सरदेसाई यांना त्यासंबंधी विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की आपणावर टीका करून काहीही साध्य होणार नाही. भाजपचा पराभव करायचा झाल्यास विरोधी पक्षांनी एकत्र येऊन महायुती करावी, असे लोकांना वाटत आहे आणि या पार्श्‍वभूमीवर ही युती व्हावी असे मत जर ‘गोवा फॉरवर्ड’ने व्यक्त केले तर काय चुकले, असा सवालही सरदेसाई यांनी केला. ज्या गट अध्यक्षांनी आपणावर टीका केली त्यांचे अस्तित्व काय आहे, असा सवाल त्यांनी केला.
युती करायची की नाही याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाचे नेते घेतील. तुम्ही पक्षासाठी काम करायचे तेवढे बघा, असे पक्षाचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांनी या लोकांना सांगून त्यांची तोंडे बंद केली हे योग्यच झाल्याचे सरदेसाई म्हणाले.