तरुण तेजपालची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

0
64

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने महिला पत्रकार बलात्कार प्रकरणाचा खटला रद्द करण्याची संशयित आरोपी तरूण तेजपाल याची याचिका फेटाळली आहे.
न्यायालयाच्या निवाड्यामुळे महिला पत्रकार बलात्कार खटला चालविण्यातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये बांबोळी येथील एका हॉटेलमध्ये महिला पत्रकार बलात्कार प्रकरण घडल्याची तक्रार आहे. या प्रकरणी क्राईन ब्रॅन्चने संशयित तरूण तेजपाल याला अटक करून त्यांच्याविरोधात फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

म्हापसा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात बलात्कार प्रकरणी सुनावणी सुरू आहे. संशयित तेजपाल यांने खटला रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने महिला पत्रकार बलात्कार प्रकरणी खटल्याची सुनावणी घेण्यास मान्यता दिलेली आहे. संशयित तेजपाल याने वरच्या न्यायालयात खटला रद्द करण्याची याचिका दाखल केल्याने सुनावणीमध्ये अडथळा निर्माण होत होता.