…तरच जुने गोवे चर्च परिसरात  गाड्यांना मान्यता : जिल्हाधिकारी

0
106

मुख्य मार्ग खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी
नियमानुसार सकाळी रस्त्यावर आणलेले गाडे रात्री हलविण्याच्या अटीवर ते गाडे जुने गोवे येथील चर्च परिसरात आणण्यास मान्यता देण्याची तयारी उत्तर गोवा जिल्हाधिकारी लिना मोहनन यांनी दाखविल्याचे जुने गोवेचे सरपंच प्रकाश आमोणकर यांनी काल सांगितले. सेंट फ्रांसिस झेवियरच्या अवशेष प्रदर्शनामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या व शव प्रदर्शन समिती सचिवांच्या आदेशानुसार जुने गोवे येथील सुमारे ६० गाडे हलविण्यात आले होते. तत्कलिन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गाडेवाल्यांना अवशेष प्रदर्शनानंतर पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे गाडेवाल्यांनी गाडे हलविले होते. अजूनही चर्चच्या परिसरात काही स्टॉल्स आहेत व साहित्यही पडून आहे. त्यामुळेच महामार्ग वाहतुकीस बंद ठेवल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.
महामार्ग बंद ठेवणे कायद्याच्या चौकटीत बसत नसल्याचे पंच सिध्देश नाईक यांचे म्हणणे आहे.