Home बातम्या ड्रग्सप्रकरणी संशयितासबंगळुरू विमानतळावर अटक

ड्रग्सप्रकरणी संशयितासबंगळुरू विमानतळावर अटक

0

राज्यातील सुमारे 11.7 कोटी रुपयांच्या अमलीपदार्थ प्रकरणातील फरारी संशयित आरोपी विनेश वाय. के. (शिवोली – बार्देश, मूळ – केरळ) याला बंगळुरू विमानतळावर 7 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली आहे. अमलीपदार्थ प्रकरणात मूळचा केरळचा रहिवासी असलेला फरारी संशयित आरोपी विनेश वाय. के. याच्याविरोधात लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. गोवा अमलीपदार्थ विरोधी पथकाने शिवोली येथील छाप्यात 11.7 कोटीचा अमलीपदार्थ हस्तगत केला होता. एएनसीने जप्त केलेल्या 110.70 ग्रॅम एलएसडी लिक्विड या अमलीपदार्थ प्रकरणाशी त्याचा शोध घेतला जात होता. गोवा पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. ब्यूरो ऑफ इमिग्रेशनने 7 डिसेंबर 2025 रोजी बंगळुरू विमानतळावर विनेशला ताब्यात घेतले. त्यानंतर एएनसी पोलीस स्थानकाच्या एका पथकाने ताबडतोब बंगळुरूला धाव घेऊन संशयित विनेश याला गोव्यात आणण्यासाठी ट्रान्झिट रिमांड मिळवला आणि त्याला गोव्यात परत आणले. संशयित आरोपी विनेशला 4 दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील न्यायालयाने काल दिला.