कोकण मराठी परिषद गोवातर्फे दिला जाणारा कविकुलगुरू कालिदास पुरस्कार यंदा सव्यसाची समीक्षक तथा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सोमनाथ कोमरपंत यांना जाहीर झाला आहे. कोमपच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष व कोमपचे अध्यक्ष सागर जावडेकर यांनी गुरुवारी या चौदाव्या पुरस्काराच्या मानकर्याचे नाव घोषित केले.
रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोमपतर्फे आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी आषाढस्य प्रथम दिवसे या कार्यक्रमात हा पुरस्कार मान्यवर साहित्यिकास प्रदान करण्यात येतो. यंदा हा कार्यक्रम ११ जुलै रोजी होणार आहे.
आतापर्यंत विनायक खेडेकर, गजानन रायकर, पु. शि. नार्वेकर, श्रीराम कामत, विष्णू सूर्या वाघ, अशोक नाईक तुयेकर ’पुष्पाग्रज’, प्रा. एस. एस. नाडकर्णी, सुदेश लोटलीकर, लक्ष्मण पित्रे, सुरेश वाळवे यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कोमपच्या गुरुवारी झालेल्या बैठकीला कार्याध्यक्ष नारायण महाले, सचिव चित्रा क्षीरसागर, खजिनदार अजित नार्वेकर, सदस्य मंगेश काळे व प्रकाश क्षीरसागर उपस्थित होते.