Home बातम्या डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सव आजपासून

डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सव आजपासून

0

बुद्धीला वैचारिक खाद्य देणारा गोवा राज्य कला आणि संस्कृती संचालनालयाचा पाचवा डी. डी. कोसंबी वैचारिक महोत्सव आज पासून सुरू होत आहे. ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान कांपाल पणजी येते कला अकादमीच्या मा. दिनानाथ मंगेशकर सभागृहात जागतिक कीर्तीच्या विचारवंताना ऐकण्याची नामी संधी गोमंतकीयांना मिळणार आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन आज दि. ७ रोजी सायंकाळी ५ वाजता चित्रपट दिग्दर्शक सईद मिर्झा यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनानंतर ५.१५ वाजता श्रीमती उमा दासगुप्ता यांचे व्याख्यान होणार आहे. त्या प्रसिद्ध लेखिका आणि कोलकाता येथील भारतीय सांख्यिकी संस्थेच्या समाजशास्त्र विभागाच्या संशोधन प्राध्यापक म्हणून मौलिक कार्य केले आहे. दासगुप्ता या मिटींग ऑफ ईस्ट एंड व्हेस्ट ः रवींद्रनाथ टागोर्स चॅलेंजिंग आयडियास फॉर वल्ड चेंज या विषयावर भाष्य करतील. दासगुप्ता यांना कोलकाता विद्यापीठाचे आधुनिक इतिहास विषयात आणि प्रेसिडेन्सि महाविद्यालयाचे इतिहास या विषयात सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे. त्यांनी अनेक पुस्तकाचे संपादन केलेले आहे. त्यात विज्ञात आणि आधुनिक भारतः संस्थानिक इतिहास, द ऑक्सफोर्ड इंडिया टागोर, माय लाईफ इन माय व्हर्डस्, अ डिफिकल्ट फ्रेन्डशिप तसेच टागोर यांचे चरित्र या पुस्तकांचा समावेश आहे. श्रीमती दासगुप्ता या शांतिनिकेतन आश्रमाच्या सभासद आहेत.

विद्यार्थी, विचारवंत, साहित्यिक व व्याख्यान प्रेमींनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कला आणि संस्कृती संचालनालयाने केले आहे.