डीआयजी गुप्ता यांना अटकपूर्व जामीन

0
90

येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने कथित लाच प्रकरणी माजी पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) विमल गुप्ता यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
एससीबीने लाच प्रकरणी माजी पोलीस उपमहानिरीक्षक गुप्ता व इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अटक होण्याची शक्यता असल्याने गुप्ता यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता.

या कथित लाचप्रकरणी गुप्ता यांना अटक केल्यास त्यांची ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर सुटका करावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. पोलीस खात्यातील महिला उपनिरीक्षक देवयानी आंबेकर हिच्याकडून खातेनिहाय चौकशी प्रकरण बंद करण्यासाठी तत्कालीन उप पोलीस महानिरीक्षक गुप्ता यांनी लाच घेतल्याचा आरोप आहे.

सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला उपनिरीक्षक आंबेकर, पोलीस शिपाई चेतन मोरजकर यांना निलंबित करण्यात आले आहे. राज्य सरकारने तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांना तडकाफडकी सेवेतून मुक्त करून दिल्ली येथे गृहमंत्रालयाशी संपर्क साधण्याची सूचना केली.