धेंपो क्रिकेट क्लबला अजिंक्यपद

0
112

>> प्रीमियर डिव्हिजन लीग क्रिकेट; अंतिम सामन्यात जिनोवर २५ धावांनी मात

कर्णधार दर्शन मिसाळ आणि हर्षद गडेकर यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर धेंपो क्रिकेट क्लबने आपले वर्चस्व कायम राखताना जीनो क्रिकेट क्लबचा २५ धावांनी पराभव करीत गोवा क्रिकेट संघटना आयोजित प्रीमियर डिव्हिजन लीग २०१७-१८ क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या तीन दिवशीय अंतिम सामन्याच्या शेवटच्या दिवशी विजयासाठीच्या ३१६ धावांचा पाठलाग करताना जीनो क्रिकेट क्लबचा डाव १०२.३ षट्‌कांत २९० धावांवर संपुष्टात आला. संग्राम अतितकरने ६ चौकारांच्या सहाय्याने ७७ चेंडूत ५० धावांची खेळी केली. सौरभ बांदेकर आणि रिगन पिंटो यांनी सहाव्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. राहुल केणीने ४९ धावांचे योगदान दिले. धेंपोला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावताना कर्णधार दर्शन मिसाळने ३ तर हर्षद गडेकरने ४ बळी मिळविले.

संक्षिप्त धावफलक ः धेंपो क्रिकेट क्लब, पहिला डाव १४६, जीनो क्रिेकेट क्लब, पहिला डाव १६५, धेंपो क्रिकेट क्लब, दुसरा डाव ३३४, जीनो क्रिकेट क्लब, दुसरा डाव, (बिनबाद ६२ धावांवरून पुढे) – १०२.३ षट्‌कांत सर्वबाद २९०, (संग्राम अतितकर ५०, प्रथमेश गावस २७, मंथन खुटकर ३२, सगुण कामत २५, चिराग खुराना ०, रिगन पिंटो ३६, सौरभ बांदेकर ४२, राहुल केणी ४९, गौरव देसाई ३, विकास मिश्रा ५, सागर नाईक नाबाद ० धावा. दर्शन मिसाळ ५-११७, हर्षद गडेकर ४-३१, विनय चौधरी १-९६ बळी).