ठाकरेंचे पक्षप्रमुख पदच बेकायदेशीर!

0
10

>> शिंदे गटाचा आयोगासमोर युक्तिवाद

केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेना कुणाची यावर शिंदे विरुद्ध ठाकरे गट असा सामना सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीवेळी एक महत्त्वाचा युक्तिवाद शिंदे गटाकडून करण्यात आला. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर शिवसेनेचे सगळे अधिकार उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे घेतले आणि शिवसेना पक्षप्रमुख पद तयार केले. हे पदच बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला.

सुनावणीपूर्वी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्रांच्या ४ मोठ्या बॅगा आणल्या. दोन्ही गटाकडून लाखो प्रतिज्ञापत्र, पुरावे दिली गेली. यावेळी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल आणि शिंदे गटाकडून ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला.

दुसर्‍या बाजूला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरुच असून, आता पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. कदाचित त्याच दिवशी घटनापीठावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या प्रकरणावर सलग सुनावणी घेतली जाईल.