दामाडे थिवी बार्देश मार्गावर काल बुधवारी दुपारी ३:३० वा.च्या दरम्यान टेम्पो व स्कुटर यांच्यात अपघात होऊन गणेश सुधीर मंडल (३८) हा मूळ पश्चिम बंगालमधील तरुण टेम्पोच्या मागील चाकाखाली चिरडल्याने ठार झाला. गणेश हा सध्या गोठणीचा व्हाळ कोलवाळ येथे रहात होता. टेम्पो एमएच ०८ एच ८८३३ हा व डीओ स्कुटर जीएच ०३ एबी ०२०२ ही दोन्ही वाहने अस्नोड्याहुन म्हापशाकडे येत होती. यावेळी स्कूटरचालक गणेश हा टेम्पोला ओव्हरटेक करत असताना टेम्पोचा त्याला धक्का लागला. त्यामुळे तो दुचाकीसहीत टेम्पोच्या मागच्या चाकाखाली चिरडला व जागीच ठार झाला. कोलवाळ पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गॉमेकात पाठवला असून टेम्पोचालक दिनेश लक्ष्मण उंदेरे (४२) चिपळूण रत्नागिरी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.