घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात १५ रुपयांची वाढ

0
32

घरगुती एलपीजी सिलिडर पुन्हा एकदा महाग झाले आहेत. आता तेल कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलो सिलिंडरच्या किंमतीत १५ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे या सिलिंडरचे दिल्लीतील दर ८८४.५० रुपयांवरून ८९९.५० रुपयांवर गेले आहेत.

कोलकातामध्ये ९२६ आणि चेन्नईमध्ये ९१५.५० रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी १ सप्टेंबर रोजी १४.२ किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. याआधी जुलै आणि ऑगस्टमध्ये किंमती वाढवण्यात आल्या होत्या. मे आणि जूनमध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.