राज्यातील ७० टक्के मुलांना होऊन गेला कोरोना

0
31

>> गोमेकॉचे डीन डॉ. बांदेकर यांच्याकडून स्पष्ट

राज्यातील ७० टक्के मुलांना यापूर्वीच कोरोनाचा संसर्ग झालेला असून कोणत्याही औषधा शिवाय ही मुले बरी झाली असल्याचे आढळून आले असल्याचे काल गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी काल स्पष्ट केले. उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार राज्यातील ७० टक्के मुलांना यापूर्वीच कोरोनाचा संसर्ग झालेला असून ही मुले कोणत्याही औषधाशिवाय आपोआप बरी झाली असल्याचे सिरोपॉझिटिव्हीटीवरून स्पष्ट झाले असल्याचे डॉ. बांदेकर यांनी स्पष्ट केले. एका पाहणीतून हे स्पष्ट झाल्याचे डॉ. बांदेकर यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
सिरोपॉझिटिव्हीमुळे रक्तातील शिरांमध्ये प्रतिपिंडे आढळून येत असल्याचे डॉ. बांदेकर म्हणाले.

दरम्यान, राज्यात तिसरी लाट आली तर ती फार काळ टिकणारी नसेल, असे वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीचे चेअरमन असलेल्या डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले. तिसर्‍या लाटेसाठी गोव्याची तयारी ही जवळ जवळ ९० टक्के पूर्ण झाली आहे. त्यासाठी मुलांची काळजी, घेण्यास आवश्यक असलेले आयसीयू कक्ष यापूर्वीच तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तज्ज्ञांच्या समितीचे कोविड पॉझिटिव्ही टक्केवारीवर बारीक लक्ष आहे जर ही पॉझिटिव्हीटीची टक्केवारी वाढली तर सुरू करण्यात आलेले सगळे उद्योग व पर्यटन व्यवसाय बंद करण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोविड संक्रमणाच्या दरात वाढ

>> चोवीस तासांत पॉझिटिव्हिटी २.३ टक्के, ९७ बाधित

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले नवे ९७ रुग्ण सापडले आहेत. तर एकाचाही मृत्यू झाला नाही. तसेच कोरोनाच्या संक्रमणाच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.०३ टक्के होता. मंगळवारी हा दर २.०२ टक्के एवढा होता.

काल बुधवारी राज्यात कोरनासाठी ४७७६ जणांची स्बॅव चाचणी करण्यात आली. गेल्या चोवीस तासांत ७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३३२२ एवढी आहे. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ७७२ झाली आहे. राज्यातील कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६९ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ८ एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १७ एवढी आहे.

मडगावातील रुग्णसंख्येत घट
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असले तरी ती संख्या १०० पेक्षा खाली आहे. सध्या मडगावात कोरोनाची रुग्णसंख्या ८३ एवढी आहे. त्या खालोखाल पणजी ५९ तर फोंडा येथे ५४ रुग्ण आहेत.