टॅक्सींना जीपीएस, मीटर सक्ती मागे घेण्याची मागणी

0
92

टुरिस्ट टॅक्सीचालकांच्या एका शिष्टमंडळाने काल वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेतली व आपल्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात, तसेच टॅक्सींना जीपीएस् व मीटर बसवण्याची सक्ती मागे घेण्यात यावी अशी विनंती केली.
यावेळी ढवळीकर यांनी टॅक्सीवाल्यांच्या मागण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे त्या समितीची बैठक १० मे रोजी होणार असून या बैठकीत त्यांच्या मागण्यांसंबंधी निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
टॅक्सींवर जीपीएस व मीटर बसवण्यात आलेले नसल्याने आरटीओ गाड्यांना तंदुरुस्तीसाठी प्रमाणपत्र देत नसल्याचे टॅक्सीचालकांनी यावेळी वाहतूक मंत्र्यांच्या नजरेत आणून दिले.
आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही वाहतूक खात्याला चार आठवड्यांची मुदत दिली होती पण आता ती मुदत संपलेली असताना खात्याने एकही मागणी मान्य केली नसल्याचे शिष्टमंडळाने ढवळीकर यांच्या नजरेत आणून दिले.