टी-२० तिरंगी मालिकेसाठी भारतीय महिला संघ घोषित

0
109

मुंबईत २२ मार्चपासून सुरू होणर्‍या महिलांच्या टी-२० तिरंगी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून संघाचे नेतृत्व तडफदार फलंदाज हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपविण्यात आले आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे अन्य दोन संघ या मालिकेत खेळणार आहेत.

स्पर्धेचा अंतिम सामना ३१ मार्च रोजी होईल. त्यापूर्वी होणार्‍या दोन सराव सामन्यांसाठी इंडिया अ संघाचीही घोषणा करण्यात आली आहे. हे सराव सामने १८ व १९ मार्च रोजी खेळविले जातील.

घोषित संघ पुढीलप्रमाणे : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमाह रॉड्रिगेस, अंजली पाटील, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (यष्टिरक्षक), पूनम यादव, एकता बिष्ट, झूलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, रुमेली धार, मोना मेश्राम.
सामन्यांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे ः भारत वि. ऑस्ट्रेलिया २२ मार्च, ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड २३ मार्च, भारत वि. इंग्लंड २५ मार्च, भारत वि. ऑस्ट्रेलिया २६ मार्च, ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड २८ मार्च, भारत वि. इंग्लंड २९ मार्च.