टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

0
114

दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळविण्याच्या उंबरठ्यावर टीम इंडिया आहे. पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपलेल्या पाहुण्यांची फॉलोऑननंतर दुसर्‍या डावात ८ बाद १३२ अशी दयनीय स्थिती झाली आहे. भारताला विजयासाठी केवळ २ बळींची गरज आहे, तर आफ्रिकेला डावाचा पराभव टाळण्यासाठी अजून २०३ धावा करायच्या आहेत.

एल्गारच्या जागी डी ब्रुईन
दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावात उमेश यादवचा एक चेंडू डीन एल्गारच्या हॅल्मेटवर आदळला. त्यामुळे एल्गार मैदानावरच कोसळला. एल्गारने यानंतर मैदान सोडणे पसंत केले. ‘कन्कशन सबस्ट्यिट्यूट’ म्हणून त्याच्या जागी थ्युनिस डी ब्रुईन याला उतरवण्यात आले.

साहाच्या जागी पंत
दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावातील २७व्या षटकात रविचंद्रन अश्‍विनचा एक चेंडू यष्टिरक्षक वृध्दिमान साहा याच्या बोटांवर बसला. यानंतर त्याला तीव्र वेदना जाणवू लागल्या. ग्लोव्हज काढून त्याने ड्रेसिंग रुमच्या दिशेने इशारा करत मैदान सोडले. भारताने नव्या नियमाच्या आधारे बदली खेळाडू म्हणून ऋषभ पंतला यष्टिरक्षणाची जबाबदारी दिली.

धावफलक
भारत पहिला डाव ः ९ बाद ४९७ घोषित
दक्षिण आफ्रिका पहिला डाव (२ बाद ९ वरून) ः जुबेर हमझा त्रि. गो. जडेजा ६२, फाफ ड्युप्लेसी त्रि. गो. यादव १, तेंबा बवुमा यष्टिचीत साहा गो. नदीम ३२, हेन्रिक क्लासें त्रि. गो. जडेजा ६, जॉर्ज लिंड झे. शर्मा गो. यादव ३७, डॅन पिद पायचीत गो. शमी ४, कगिसो रबाडा धावबाद ०, ऍन्रिक नॉर्के पायचीत गो. नदीम ४, लुंगी एन्गिडी नाबाद ०, अवांतर १२, एकूण ५६.२ षटकांत सर्वबाद १६२
गोलंदाजी ः मोहम्मद शमी १०-४-२२-२, उमेश यादव ९-१-४०-३, शहाबाज नदीम ११.२-४-२२-२, रवींद्र जडेजा १४-३-१९-२, रविचंद्रन अश्‍विन १२-१-४८-०
दक्षिण आफ्रिका दुसरा डाव (फॉलोऑन) ः क्विंटन डी कॉक त्रि. गो. यादव ५, डीन एल्गार जखमी निवृत्त १६, जुबेर हमझा त्रि. गो. शमी ०, फाफ ड्युप्लेसी पायचीत गो. शमी ४, तेंबा बवुमा झे. साहा गो. शमी ०, हेन्रिक क्लासें पायचीत गो. यादव ५, जॉर्ज लिंड धावबाद २७, डॅन पिद त्रि. गो. जडेजा २३, थ्युनिस डी ब्रुईन (कन्कशन सबस्ट्यिट्यूट) नाबाद ३०, कगिसो रबाडा झे. जडेजा गो. अश्‍विन १२, ऍन्रिक नॉर्के नाबाद ५, अवांतर ५, एकूण ४६ षटकांत ८ बाद १३२
गोलंदाजी ः मोहम्मद शमी ९-५-१०-३, उमेश यादव ९-१-३५-२, रवींद्र जडेजा १३-५-३६-१, शहाबाज नदीम ५-०-१८-०, रविचंद्रन अश्‍विन १०-३-२८-१