पर्यटन खात्याने हॉटेल व्यावसायिकांना ‘टाईम’ सॉफ्टवेअर आधारे पर्यटकांची माहिती देण्याचे आदेश दिला आहे. पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांनी हा आदेश जारी केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पर्यटकांची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.