झूक्सची बार्बेडोसवर ३ धावांनी मात

0
119

केसरिक विल्यम्स व जवाल ग्लेन यांनी दबावाखाली केलेल्या अचूक मार्‍याच्या बळावर सेंट लुसिया झूक्सने ९२ धावांचा यशस्वी बचाव करताना कॅरेबियन प्रीमियर लीगच्या रविवारी झालेल्या १९व्या सामन्यात बार्बेडोस ट्रायडंटस्‌वर ३ धावांनी निसटता विजय संपादन केला.

नाणेफेक जिंकून ट्रायडंटस्‌ने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर गोलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर जुळवून घेणे झूक्सच्या फलंदाजांना कठीण गेले. लेनिको बाऊचर (१८), रॉस्टन चेज (१८) व नजिबुल्ला झादरान (२२) यांचा अपवाद वगळता इतरांना दुहेरी धावसंख्या करता आली नाही. झूक्सचा डाव १८ षटकांत ९२ धावांत आटोपला. बार्बेडोसकडून हेडन वॉल्श ज्युनियर सर्वांत प्रभावी ठरला. त्याने १९ धावा देत ३ गडी बाद केले. रेयमन रिफरने २ तर जोशुआ बिशप, जेसन होल्डर, राशिद खान व ऍश्‍ले नर्स यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

माफक लक्ष्याचा पाठलाग करताना जॉन्सन चार्ल्स (३९) व शेय होप (१४) यांनी बार्बेडोसला ३२ धावांची चांगली सलामी दिली. शेय होप पहिल्या गड्याच्या रुपात परतल्यानंतर झूक्सच्या गोलंदाजांनी दबाव टाकला. त्यामुळे ठराविक अंतराने त्यांचे गडी बाद होत राहिले.
शेवटच्या २ षटकांत १३ धावांची आवश्यकता असताना लेगस्पिन गोलंदाज ग्लेन याने १९वे षटक टाकताना या षटकात केवळ ४ धावा देत राशिद खान याला मोहम्मद नबीकरवी झेलबाद केले. त्यामुळे शेवटच्या षटकांत ट्रायडंटस्ला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता पडली. चेस याने या षटकात केवळ पाच धावा देताना ऍश्‍ले नर्स (१२) याला बाद केले.

बार्बेडोसला निर्धारित २० षटकांत ७ बाद ८९ धावांपर्यंतच पोहोचता आले. धावांचा बचाव करताना विजय नोंदविलेली कॅरेबियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील