झुआरीनगर अपघातात 6 वर्षीय मुलाचा मृत्यू

0
11

बिट्स पिलानी झुआरीनगर येथे बुधवारी सायंकाळी एका चारचाकी वाहनाची धडक बसल्याने एका 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कुंदन राठोड असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणी वाहनचालक कपिल बेटगिरी याच्याविरुद्ध वेर्णा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कपिल बेटगिरी हा आपली कार (क्र. जीए-08-एम-8586) वेर्णाहून दाबोळीच्या दिशेने जात असताना बिट्स पिलानी बिर्ला येथे पोचला असता त्याच्या कारने कुंदन राठोड नावाच्या एका लहान मुलाला जोरदार धडक दिली, त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित चिखली येथे उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले; मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. वेर्णा पोलिसांनी पंचनामा करून निष्काळजीपणे गाडी चालवल्याबद्दल कपिल बेटगिरी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला.