Home Featured झारखंडमध्ये पूल कोसळला

झारखंडमध्ये पूल कोसळला

0

बिहारनंतर आता झारखंडमध्येही एक निर्माणाधीन पूल कोसळल्याची घटना घडली आहे. गिरिडीह जिल्ह्यातील देवरी ब्लॉकमध्ये अर्गा नदीवर हा पूल बांधण्यात येत होता. शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढली व नदीच्या जोरदार प्रवाहामुळे बांधकामाधीन पुलाचा एक पिलर खचला त्यामुळे गर्डर तुटून पडला. दुसरा पिलरही वाकडा झाला. यानंतर मोठ्या आवाजाने बांधकामाधीन पुलाचा गर्डर तुटून नदीत पडला. साडेपाच कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येत होता.