ज्योतिरादित्य शिंदे पायउतार

0
116

>> कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच असून काल कॉंग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांच्या कॉंग्रेस महासचिवपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही काल आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेसच्या महासचिवपदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे पाठविला आहे. लोकांनी दिलेला जनाधार स्वीकारत जबाबदारी म्हणून राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मला ही जबाबदारी दिल्याबद्दल तसेच पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल आभारी असल्याचे शिंदे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. ’मी आज नाही तर ८-१० दिवसांपूर्वीच राहुल गांधींकडे राजीनामा पाठवला होता.

दुसर्‍या नेत्यांना राजीनामा द्यायचे आदेश द्यायला मी नेता नाही. जेव्हा तुम्हांला पद दिले जाते तेव्हा तुमच्यावर जबाबदारीही येते. जर तुमची कामगिरी चांगली झाली नसेल, तर ती जबाबदारी माझीही आहे. त्यामुळे मी राजीनामा द्यायचा निर्णय घेतला,’ अशी प्रतिक्रिया ज्योतिरादित्य यांनी दिली.