ज्ञानवापी मशीद प्रकरणी न्यायालयात अहवाल सादर

0
16

ज्ञानवापी मशीद प्रकरणात भारतीय पुरातत्व विभागाने आपला अहवाल वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सुपूर्द केला आहे. हा अहवाल एका सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला होता. यानंतर आता या प्रकरणात 21 डिसेंबर रोजी पुढची सुनावणी होणार आहे. हा अहवाल सार्वजनिक करा अशी मागणी हिंदू पक्षकारांनी केली आहे, तर मुस्लिम पक्षकारांनी हा अहवाल सीलबंदच ठेवावा अशी मागणी लावून धरली आहे. या पक्षकारांना हा अहवाल पत्र रुपात मिळावा असे न्यायाधीशांनी म्हटले आहे