जैववैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट न लावणार्‍यांवर कडक कारवाई

0
15

>> राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा

राज्यातील इस्पितळे व अन्य आरोग्य सुविधा देणारी जी केंद्रे आपल्या जैववैद्यकीय कचर्‍याची कुंडई येथील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पात नेऊन विल्हेवाट लावणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा काल गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला.

आपल्या आरोग्य केंद्रातील जैववैद्यकीय कचर्‍यावर कुंडई येथील प्रक्रिया प्रकल्पात विल्हेवाट लावण्यासाठी या केंद्रांना आता ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात येणार असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्पष्ट केले आहे.

२०१६च्या जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियम १० नुसार असा कचरा ज्या केंद्रांकडे आहे अथवा जो हाताळत आहे, त्याला त्याच्याकडे कितीही कमी किंवा कितीही जास्त कचरा असला तरी त्या संबंधीचा लेखाजोखा ठेवण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज करणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधितांनी वरील कायद्याखाली मंडळाच्या ऑनलाईन पोर्टलवर ३१ मार्चपर्यंत अर्ज करावा. तसेच कुंडई आयडीसी येथील जैववैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पात जैववैद्यकीय कचरा नेऊन त्याची विल्हेवाट लावण्याची सोय करावी, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.