जुवारी नदीत मरिना प्रकल्प नको : कॉंग्रेस

0
54

पर्यटनाच्या नावाखाली जुवारी नदीत मरिना आणण्याचे सरकारचे प्रयत्न असून त्यामुळे खारीवाडा, वास्को येथील मच्छिमारी जेटीवरही संक्रांत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या यादीतून वरील प्रकल्प रद्द करावेत, अशी मागणी प्रदेश कॉंग्रेस प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो यांनी केली आहे. मुरगाव बंदर मंडळाच्या एका बैठकीच्या इतिवृत्तात खारीवाडा येथील जेटी हलविण्याचे स्पष्ट केलेले आहे. राज्यातील मच्छिमारांच्या व्यवसायावर संकट आणणारे महागडे पर्यटन प्रकल्प गोमंतकीयांना नको आहेत. मरिनाच्या नावाखाली राज्यातील जमीन मरीना कंपनीच्या हातात देवू नये, अशी मागणी त्यांनी केली.