Home बातम्या जीसीएची निवडणूक पुढे ढकलली

जीसीएची निवडणूक पुढे ढकलली

0

प्रत्येक क्लबास एक लाख रु.

दयानंद नार्वेकर यांच्याकडून गोवा क्रिकेट असोसिएशनचा ताबा घेतलेल्या विनोद फडके यांच्या अध्यक्षतेखालील नवीन समितीची पहिली बैठक काल झाली. यात दि. २७ रोजी होऊ घातलेल्या असोसिएशनची निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय प्रत्येक क्लबास एक लाख रु. जाहीर करण्यात आले.

जीसीएकडे एकूण १२१ क्लबांची नोंदणी झाली असून त्यात एक वर्ष खेळलेल्या क्लबांचा समावेश आहे. नियमानुसार तीन वर्षे खेळलेल्याच क्लबांनाच सदस्यत्व देण्यात येते असे फडके म्हणाले. दरम्यान, गोवा क्रिकेट असोसिएशनच्या घडामोडींबाबत आणि नव्या समितीने पदभार स्वीकारल्याबाबत बीसीसीआयला कळविले असून त्यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्याचेही नूतन अध्यक्षांनी सांगितले.

कालच्या बैठकीत नवीन समितीला पुढीलप्रमाणे पदांचे वाटक करण्यात आले-

अध्यक्ष – विनोद ऊर्फ बाळू फडके, सचिव – प्रसाद फातर्पेकर, उपाध्यक्ष – संजय काणेकर, विलास देसाई, शरद चोपडेकर, खजिनदार – अमरेश नाईक, सहसचिव – विवेक पेडणेकर, जमीर कॅरोल, देश किनळेकर.

सदस्य – श्रीकृष्ण तारी, प्रकाश फडते, मेघनाथ शिरोडकर, दया पागी, सुदेश प्रभूदेसाई व किशोरी हळदणकर (नियुक्त)

दरम्यान, कालही नवीन समिती कार्यालया पोचली तेव्हा कुणीतरी कुलुपे ठोकल्याचे निदर्शनास आले त्यामुळे समितीला चकरा मारत थांबावे लागले. शेवटी ती कुलूपे तोडून नवीन बसविण्याचा निर्णय घेऊन समितीने आत प्रवेश मिळविला. याबाबत पवर्र्री पोलीस स्थानकात तक्रार नोंदविल्याचे कळते.