जीवनावश्यक वस्तूंची दुप्पट दराने विक्री

0
134

जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्‍या विक्रेत्यांनी कोरोनामुळे आलेल्या आपत्तीचा फायदा उठवीत जीवनावश्यक वस्तू दाम दुप्पट भावाने विकण्याचे सत्र आरंभले आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही सगळी लूट चालू असताना राज्य सरकारने मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने या विक्रेत्यांना ग्राहकांना लुटण्यासाठी मोकळे रान मिळाले आहे.

काल पणजी, मडगाव या प्रमुख शहरांबरोबर सर्व ठिकाणी जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना विक्रेत्यांनी लुटल्याचे वृत्त आहे.

सध्या बाजारात कांदा ५० ते ६० रु., बटाटे ८० रु., गव्हाचे पीठ (सुटे) ५० रु., मेथी भाजीची जुडी ५० रु., कोथंबीर जुडी ५० रु., टॉमेटो ५० रु., साखर ६० ते ५० रु. अशा दरात विक्री चालू असून या वस्तू उद्या मिळतील की नाही या भीतीपोटी लोक चढे दर असतानाही वस्तू विकत घेताना दिसत आहेत. दरम्यान, राज्यातून पिल्सबरी, आशीर्वाद आदी आटा पूर्णपणे गायबच झाला आहे.

विक्रेत्यांनी दुप्पट किंमतीत वस्तू विकून ग्राहकांची फसवणूक करू नये. तसे करणार्‍यांवर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यापलिकडे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काहीही करीत नसल्याचे या ग्राहकांना लोकांना लुटण्यासाठी मोकळे रान मिळाले असल्याचा आरोप काल प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला. मुख्यमंत्री सावंत यांचे प्रशासनावरील नियंत्रण पूर्णपणे सुटले असल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला.